OLA आता संपूर्ण महिना कार भाड्यावर देणार, गाडी खरेदी करण्याची चिंता दूर होणार
OLA Cabs (Photo Credits-Twitter)

ओला (OLA) कंपनीने आता ग्राहकांना संपूर्ण महिना कार भाड्यावर देणार असल्याची नवी सेवा सुरु करण्याचे ठरविले आहे. तसेच येत्या दोन वर्षात ओला कंपनीला 50 करोड डॉलर रुपयांची आर्थिक गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले जात आहे. या सेवेमध्ये ग्राहकांना स्वत:च गाडी ओला कंपनीकडून घेऊन ती चालवता येणार आहे.

सध्या ही सेवा बंगळुरु येथे सुरु करण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यात ही सेवा मोठ्या संख्येने सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने या सेवेसाठी जवळजवळ 10,000 गाड्या भाड्यावर देण्याची शक्यता आहे.

इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या सेवेसाठी ओला कंपनी फ्लीट टेक्नॉलीजीकडून पैसे घेणार आहे. तर लवकरच ही सेवा सर्वत्र सुरु होणार असल्याचे ओला कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.