LPG Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या विना अनुदानित किंमतीत मोठी वाढ; आज पासून मुंबई, दिल्ली, कोलकता येथे लागु झालेले नवे दर जाणुन घ्या
Gas Cylinder (Photo Credits: Twitter)

देशभरातील महानगरांमध्ये आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder Prices) दरात वाढ होऊन नवीन भाव लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ केवळ विना अनुदानित सिलेंडरसाठी लागू होणार आहेत, सद्य घडीला घरामागे 12 सिलेंडरवर सरकारतर्फे अनुदान देण्यात येते, त्यावरील प्रत्येक सिलेंडरसाठी वेगळी रक्कम मोजावी लागते, हीच रक्कम आजपासून वाढवण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 पासून हे भाव स्थिर होते त्यानंतर थेट आज ,म्हणजेच 12 फेब्रुवारीला हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत. आताचे नवीन दर पाहिल्यास, मुंबई (Mumbai) मध्ये प्रति सिलेंडर 145 रुपये , दिल्ली (Delhi) मध्ये 144 रुपये, कोलकाता (kolkata) येथे 149 रुपये तर चेन्नई (Chennai) मध्ये 147 रुपये इतकी मोठी वाढ झाली आहे, परिणामी येत्या काळात विनाअनुदानित सिलेंडर खरेदी करायचे झाल्यास सामन्यांच्या खर्चाची गणिते कोलमडली जाऊ शकतात.

प्राप्त माहितीनुसार, अनुदानित सिलेंडरच्या किमतीत दरवाढीचा फरक पडणार नाही. तर घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ ही केवळ महानगरात लागू करण्यात आली आहे, मुंबई सह दिल्ली कोलकाता येथील आजचे दर जाणून घ्या..

जर तुमच्या घरी उशिराने LPG आल्यास तक्रार करा, विक्रेत्याचे कापले जाणार कमिशन

मुंबई: 829.50 रुपये

दिल्ली: 858.50 रुपये

कोलकाता: 896.00 रुपये

चेन्नई : 881.00 रुपये

दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढीचा फटका बसला होता, सातत्याने पाचव्या वेळेस गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ करत असताना घरगुती गॅसच्या किंमती 21.50 रुपयांनी वाढली होती. त्यांनतर आता पुन्हा मोठ्या शहरात जवळपास १५० रुपयांची मोठी वाढ करून सामान्यांना धक्का देण्यात आला आहे.