Nirbhaya Case: निर्भया प्रकरणातील दोषी पवन कुमार याची सर्वोच्च न्यायालयात Curative Petition  दाखल; फाशीची शिक्षा मरेपर्यंत जन्मठेपेत बदलण्याची विनंती
Nirbhaya Case Convicts | File Image

Nirbhaya Gangrape And Murder Case: दिल्ली येथे 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता (Pawan Gupta) याने सर्वोच्च न्यायालयात  (Supreme Court ) क्यूरेटिव पिटिशन (Curative Petition) दाखल केली आहे. या पिटिशनमध्ये पवन गुप्ता याने आपली फाशीची शिक्षा मरेपर्तंयत जन्मठेपेत बदलावी अशी विनंती केली आहे. पवन गुप्ता याचे वकील एपी सिंह यांनी न्यायालयात याबाबत माहिती दिली आहे. सिंह यांनी सांगितले की, आपल्या आशीलाने त्याला मिळालेली फाशीची शिक्षा मरेपर्यंत जनमेठेपेत बदलण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

निर्भया प्रकरणात दोषी ठरलेल्या मुकेश कुमार, अक्षय ठाकूर आणि विनय कुमार या तिघांच्याही याचिका न्यायालयाने या आधीच फेटाळून लावल्या आहेत. मुकेश याने याचिका फेटाळून लावल्याबद्दल सर्वाच्च न्यायालयात रिटही दाखल केली होती. पण तीही न्यायालयाने फेटाळून लावली. पवन याने आतापर्यंत क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल केली नव्हती. मात्र, आता त्याने ही याचिका दाखल करत आपली शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे. (हेही वाचा, Nirbhaya Gangrape Case: दोषी विनय शर्मा याचा तिहार जेलमध्ये भिंतीवर डोके आपटून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न)

एएनआय ट्विट

पटियाला हाऊस कोर्टाने निर्भया प्रकरणात जारी केलेल्या डेथ वॉरंटनुसार तीन मार्च या दिवशी सकाळी 6 वाजता दोषींना फाशी दिले जावे लागणार आहे. दरम्यान, कारागृहातील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फाशीची तयारी अशा पद्धतीने केली जात आहे की, ज्याची यत्किंचीतही खबर दोषींना लागणार नाही. दोशींना दिल्या जाणाऱ्या फाशीच्या चौथऱ्याची दररोज साफसफाई केली जात आहे. तसेच, फाशीचा दोरही योग्य पद्धतीने पेटीत ठेवण्यात आला आहे. प्रत्येक दिवशी याचीही तपासणी केली जात आहे की, फाशीच्या दोरखंडात काही समस्या तर नाही ना.