ज्या प्रकारे जगातील अनेक देश कोरोना विषाणूचे (Corona Virus) शिकार झाले आहे, तसेच आता भारतातही (India) हा व्हायरस थैमान घालत आहे. नुकतेच राजस्थानमधील (Rajasthan) एका वृद्धास कोरोनाची पुष्टी झाली आहे. अशाप्रकारे भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित अशा लोकांची संख्या 62 झाली आहे. कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. त्यांचे आतापर्यंत जारी केलेले नियमित आणि ई-व्हिसा यांच्यावर स्थगिती आणली आहे.
केरळमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 17 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 प्रकरणे अशी आहेत, ज्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. दुबईहून परत आलेल्या जयपूर येथील वृद्ध व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या व्यक्तीचा दुसरा तपास अहवालही सकारात्मक झाला आहे. राजस्थानच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, दुबई ते जयपूर ज्या विमानात या प्रवाशाने दुबई ते जयपूर असा प्रवास केला होता त्या विमानाबद्दल आणि त्याच्या सह प्रवाशांबद्दल तपशील गोळा केला जात आहे. ही व्यक्ती 28 फेब्रुवारीला दुबईहून जयपूरला परतली.
सध्या केरळमध्ये विविध रूग्णालयात 149 प्रभागात किमान 1,116 लोकांना निरीक्षणाखाली ठेवले गेले आहे, तर 967 लोकांना घरात स्वतंत्रपणे ठेवले गेले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 3,158 आहे. 16,145 लोकांवर उपचार सुरू आहेत, तर सुधारानंतर 61,475 लोकांनी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. (हेही वाचा: Coronavirus संबंधित जागरुकता वाढवण्यासाठी वाराणसी येथील विश्वनाथ मंदिरातील शिवलिंगावर चढवला मास्क)
पुण्यात Corona Virus चे आणखी 3 रुग्ण; शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ वर पोहचली - Watch Video
सध्या भारतात, जम्मू-काश्मीर 1, लडाख 2, राजस्थान 17, दिल्ली 4, महाराष्ट्र 5, यूपी 8, कर्नाटक 4, केरळ 17, तमिळनाडू 1 आणि तेलंगणामध्ये 1 अशा लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सध्या पुण्यात 5 संक्रमित लोक सोडून, 10 जण संशयित म्हणून नायडू रुग्णालयात ठेवले आहे. या लोकांचे नमुने आज तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.