Coronavirus संबंधित जागरुकता वाढवण्यासाठी वाराणसी येथील विश्वनाथ मंदिरातील शिवलिंगावर चढवला मास्क; भक्तांना केले 'हे' आवाहन
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी शिवलिंगावर मास्क (Photo Credits: Twitter)

चीनच्या (China) वुहान (Wuhan) शहरातून पसरलेला जीवघेणा कोरोना व्हायरस (Coronavirus) जगभरात वेगाने पसरत आहे. जपान, इटली, इराण, अमेरिका या देशांनंतर भारतातही कोरोनाच्या विषाणूंनी आपले साम्राज्य पसरवले आहे. भारतात तब्बल 47 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. भारतात वेगाने वाढणारा कोरोना व्हायरसचा फैलाव पाहता नागरिकांनामध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी भारतीय नागरिकही प्रयत्नशील आहेत. मात्र या प्रयत्नांचा एक अजब प्रकार समोर आला आहे. कोरोना व्हायरस हटवण्यासाठी रामदास आठवले यांनी अवलंबला 'हा' अनोखा उपाय (Watch Video)

देवभूमी असलेल्या वाराणसी मधील विश्वनाथ मंदिरात चक्क शिवलिंगावर (Idols) मास्क (Mask) घालण्यात आला असून भक्तांनी मूर्तीला हात लावू नये, असा फतवा काढण्यात आला आहे. एकाच नाही तर वाराणसीमधील अनेक मंदिरात मूर्त्यांना मास्क घालण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. (कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केरळ मध्ये 31 मार्च पर्यंत चित्रपटगृह, इयत्ता 7वी पर्यंत शाळा, परीक्षा रद्द)

मंदिराचे पुजारी कृष्ण आनंद पांडे (Krishna Anand Pandey) यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरसबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी भगवान विश्वनाथ शिवलिंगावर मास्क घालण्यात आला आहे. ज्याप्रमाणे थंडीत मुर्तीला कपडे घालण्यात येतात, उन्हाळात पंखा लावण्यात येतो. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भगवान विश्वनाथ यांच्या शिवलिंगावर मास्क घालण्यात आला आहे."

विशेष म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भक्तांनी देवांच्या मुर्त्यांना हात लावू नये, असेही सांगण्यात आले आहे. तसंच सध्याच्या परिस्थितीत मंदिरांमध्ये पुजारी आणि भक्त मास्क घालून प्रार्थना करत आहेत.