Death PC PIXABAY

नवी मुंबई (Navi Mumbai)  मध्ये खारघर (Kharghar) मध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीला मारहाण करून ठार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्तीचं नाव शिवकुमार रोशनलाल शर्मा (Shiv Kumar Roshanlal Sharma) आहे. शिवकुमारला दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांना ओव्हरटेक केल्यावर मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार गुरूवारी (6 फेब्रुवारी) च्या रात्री 8.30 वाजता घडला आहे. शर्मा दुचाकी वरून वाशी- खारघर (Vashi- Kharghar)  प्रवास करताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला.

बेलपाडा आणि उत्सव चौक या रस्त्यावर आल्यावर त्याने दुचाकीवरील काही पुरुषांना ओव्हरटेक केले, ज्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. शर्मा यांच्यावर हल्लेखोरांनी हेल्मेट घालून हल्ला केला होता. हल्ला करणारे विशीतील तरूण होते.  मारहाणीनंतर शर्मा यांनी 1 किमीपर्यंत दुचाकीवरून प्रवास करत खारघरच्या पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली, पोलीस ठाण्यात ते कोसळले आणि रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शिवकुमार रोशनलाल शर्मा आयटी व्यावसायिक म्हणून काम करत होता. शर्मा यांच्यावर हल्ला करून आरोपींनी तेथून पळ काढला. आरोपींना अटक झाली की नाही याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.  असे तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्याने FPJ ला सांगितले आहे. नक्की वाचा:  Pune Road Rage Case: पुण्यात हॉर्न वाजवल्याने संतापलेल्या दोन पुरुषांचा कुटुंबावर हल्ला; महिलेसह 3 जण जखमी .

 शर्मा हे खारघरच्या सेक्टर 36 येथील Swanapoorti  इमारतीत एकटेच राहत होते आणि गेल्या दोन वर्षांपासून भाड्याने तेथेच राहत आहेत. त्यापूर्वी ते वाशी येथे त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहत होते. आयटी व्यवसायात असलेले शर्मा  वाशी येथील NuSummit Technology साठी Project Manager म्हणून काम करत होते. खारघर पोलिसांनी दोघांविरुद्ध बीएनएस कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.