
लद्दाख मध्ये चीन सोबत सुरु असलेल्या गतविधींच्या दरम्यान सोमवारी सैन्याच्या कमांडरांनी चार दिवसाचे वार्षिक सम्मेलन आयोजित केले आहे. एलएसी व्यतिरिक्त कश्मीरच्या सुरक्षिततेबद्दलच्या आव्हानांवर ही चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तीन सैन्याचे प्रमुख या बैठकीत उपस्थितीत असणार आहेत.(Amit Shah J&K Visit: अनुच्छेद 370 हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रथमच जम्मू कश्मीर दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)
चार दिवसाच्या या सम्मेलनात पूर्व लद्दाख ते चीनसह एलएसीच्या जवळच्या सर्व संवेदनशील क्षेत्रासह देशातील सध्याच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य कमांडर गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू-कश्मीर मध्ये सामान्य नागरिकांची हत्यांच्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल विचार करणार आहेत. हे सम्मेलन नवी दिल्लीत आयोजित केले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, सैन्याचे प्रमुख एमएम नरवणे आणि मुख्य कमांडर पूर्व लद्दाख मध्ये देशाची लढाऊ तयारीबद्दल समीक्षा करणार आहेत. त्यानुसार गेल्या 17 महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये वाद सुरु आहेत.
सेनेने एका विधानात असे म्हटले होते की, 2021 चे दुसरे सैन्य कमांडर सम्मलेन 25-28 ऑक्टोंबर दरम्यान नवी दिल्लीत होणार आहे. सेनेच्या कमांडरांचे सम्मलेन हा एक उच्चस्तरीय कार्यक्रम असून जो वर्षातून दोनदा म्हणजे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये आयोजित केला जातो.(PM Modi Address to Nation Highlights: 'युद्ध सुरू आहे तोपर्यंत शस्त्र खाली ठेवू नका'; 100 कोटी लसींचा टप्पा पार झाला तरीही कोविड नियमावली पाळण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सेनेच्या प्रमुख कमांडर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तसेच बिपीन रावत, नौसेना प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल वीआर चौधरी सुद्धा तीन सेनेच्या दरम्यान समन्वयाला प्रोत्साहन देण्याच्या ऑप्शनबद्दल भारतीय सेनेचे मुख अधिकाऱ्यांना संबोधित करु शकतात.