Amit Shah J&K Visit: अनुच्छेद 370 हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रथमच जम्मू कश्मीर दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम
Amit Shah | (Photo credit : Facebook)

अनुच्छेद 370 (Article 370) हटवल्यानंतर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) प्रथमच जम्मू-कश्मीर (Amit Shah J&K Visit) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज (23 ऑक्टोबर) रोजी अमित शाह (Amit Shah) श्रीनगर (Srinagar) येथून या दौऱ्यास सुरुवात करतील. त्याचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीनगर येथे राज्यातील एकूण सुरक्षेचा आढावा घेतील. जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते आहे. या काळात अमित शाह हे जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.

अनुच्छेद 370 हटवून 5 ऑगस्ट 2019 या दिवशी विद्यमान केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयामळे जम्मू कश्मीरचा केंद्र शासित प्रदेश आणि विशेष राज्याचा दर्जा संपला. अमित शाह यांनी 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून सूत्रे हातात घेतली. त्या वेळी त्यांनी जम्मू कश्मीर राज्याचा दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी अमरनाथ यात्र आणि तेथील सुरक्षेचा आढावा घेतला होता.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, शाह शनिवारी श्रीनगरमध्ये सुरक्षा आणि विकास यासंदर्भात आढावा घेतील. रविवारी ते एक जनसभा घेतील. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीरमध्ये वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात चारचाकी वाहनांसोबतच दुचाकी वाहनांच्या प्रवासावरही मर्यादा आहेत. त्यांनाही चौकशीस सामोरे जावे लागत आहे. याशिवाय, सुरक्षा उद्देशांसाठी सुमारे 50 केंद्रीय रिजर्व्ह पोलीस बल (सीआरपीएफ) जवान तैनात करण्यात आले आहेत. (हेही वाचा, मुख्यमंत्री Uddhav Thackeray आणि केंद्रीय मंत्री Amit Shah यांची भेट, विरोधीपक्षनेते Devendra Fadnavis यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

जम्मू-कश्मीमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक नागरिकांच्या हत्यांनंतर केद्र शासित प्रदेशांमध्ये सुमारे 700 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही कडक सार्वजनिक सुरक्षा अधिनियम (PSA) अन्वये नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात सुरक्षाअधिनियम1978 अन्वये जम्मू कश्मीर येतून सुमारे 26 कैद्यांना आगरा येथील केंद्रीय कारागृहात स्थानांतरीत करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, अमित शाह हे सकाळी 11 वाजता श्रीनगरला पोहोचतील. तिथून ते राजभवनमध्ये सुरक्षा आढावा घेतील. या बैठकीस चार कोर मांडर, जम्मू-कश्मीर पोलीस आणि प्रमुख अधिकारी तसे गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी, केंद्रीय सशस्क्ष पोलीस दलाचे प्रमुखही उपस्थित असतील. त्यानंतर ते अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. ते श्रीनगर-शारजाह इंटरनेशनल फ्लाइटचे उद्घाटनही करतील. हे विमान श्रीनगर ते शारजाह दरम्यानचे डायरेक्‍ट फ्लाइट असेल.