अमित शहा (Amit Shah) यांनी वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात आज (26 सप्टेंबर) दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन महत्वाच्या विविध मुद्यांवर चर्चा केली. या भेटीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नक्षलवादाच्यासंदर्भात केलेल्या मागणीचे देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाच्यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी आणि नक्षल्यांना रोखण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. यावर देवेंद्र फडवणवीस म्हणाले की "महाराष्ट्रात गडचिरोली माओवाद क्षेत्र कमी होत आहे. पण शहरी नक्षलवाद मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे, महाराष्ट्र सरकारने 1200 कोटींची केंद्राकडे केलेली मागणी योग्य आहे," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागणीचे स्वागत केले आहे. हे देखील वाचा- Sanjay Raut Criticizes BJP: भाजप लोकांचे मनोरंजन करीत असताना सिनेमागृह उघडण्याची काय गरज? शिवसेना खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य
महत्वाचे म्हणजे, दुर्गम भागात नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात यावी,नक्षलग्रस्त भागात अधिकाधिक मोबाईल टॉवर बसवणे, नवीन शाळा बांधण्यावर भर देणे, अशा मागण्या उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्या आहेत.