महाराष्ट्रातील (Maharashtra) शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानुसार 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला (BJP) चिमटा काढला आहे. राज्यात भाजप लोकांचे मनोरंजन करीत असताना राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे उघडण्याची काय गरज आहे? असा प्रश्ना संजय राऊत यांनी विचारला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' मधील 'रोखठोक' या साप्ताहिक स्तंभात राऊत यांनी लिहिले की, विरोधी पक्ष भाजपने महाराष्ट्रात सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. "भाजप नेते किरीट सौमय्या दररोज राज्यातील विविध मंत्र्यांवर आरोप करीत आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघात जातात. माझे मत आहे की राज्य सरकारने त्यांच्या भेटी थांबवू नयेत. त्याचे आरोप फुग्यांसारखे आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. हे देखील वाचा- Amit Shah यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख मागणी
संजय राऊत पुढे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक निर्बंध लागू आहेत. मात्र, असे असतानाही राजकीय मनोरंजनाचा कार्यक्रम सुरुच आहे. सगळीकडे विनोद चालू आहेत. विरोधी पक्ष ज्या प्रकारे लोकांचे मनोरजंन करीत आहे. अशा परिस्थितीत लोकांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होत असताना सिनेमागृह किंवा नाट्यगृहे उघडण्याची काय गरज आहे? असा प्रश्न उपस्थित करीत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.