नरेंद्र मोदी सरकारची 6 वर्षे पूर्ण; भाजपने शेअर केला या काळातील 'या' कामांचा लेखाजोगा मांडणारा खास Video
Prime Minister Narendra Modi. (Photo Credits: PTI)

6 Saal Bemisal: नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP)  16 मे 2014 रोजी लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करत देशात सत्ता स्थापन केली होती, या सरकारला आज 6  वर्ष पूर्ण होत आहेत. संपूर्ण 30 वर्षांनी भाजपने मिळवलेली सत्ता आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व या काळात बरेच चर्चेत आले होते. या दिवसाचे औचित्य साधून आज भाजपने सोशल मीडियावरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात मागील सहा वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोगा मांडण्यात आला आहे. या लॉक डाऊन काळात मोठे सेलिब्रेशन करण्याऐवजी 'मोदी सरकार चे 6 बेमिसाल साल' या व्हिडिओतून भाजपने आनंद साजरा केला आहे. या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आलेले मोदी सरकारचे कार्य थोडक्यात जाणून घेऊयात..

नरेंद्र मोदी सरकार ने मागील सहा वर्षात काय केले?

- 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून स्वच्छता अभियान सुरुवात केली. मागील सहा वर्षात कित्येक ठिकाणी स्वतः झाडू हातात घेत मोदींनी स्वच्छतेचे धडे दिले.

- गावागावात वीज पुरवठा व्हावा यासाठी काम करण्यात आले, ज्यानांतर्गत देशातील 18 हजार गावात वीज पोहचवण्यात आली. कमी वीज खर्च व्हावी यासाठी केंद्र सरकारने देशात जवळपास 36 कोटी LED लाईट्स वाटल्या आहेत.

- जनधन योजेनच्या अंतगर्त सर्व गरिबांना बँक अकाउंट खोलता येईल यासाठी झिरो बॅलन्स अकाउंट सुविधा पुरवली. आतापर्यंत यानांतर्गत 38 कोटी अकाऊंट सुरु झाले आहेत.

- देशात 10 कोटी शौचालय उभारण्यात आले आहेत.

-2कोटी आवास उभारण्यात आले आहेत.

- मुद्रा योजनेच्या अंतर्गत 24  कोटी लोकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

- स्किल इंडिया योजनेतून 70 लाख लोकांना विविध कामांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

- सॉयल हेल्थ कार्ड मार्फत 22 कोटी शेतकर्‍यांंना बाजार,सिंचन, पीक विमा यासारख्या गरजांसाठी मदत पुरवण्यात आली आहे. वार्षिक सहा हजार रुपयांची मदत सुद्धा या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे.

- बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ योजना, सुकन्या समृद्धि, उज्ज्वला योजना, इंद्रधनुष योजनेच्या मार्फत महिला आणि बालविकासासाठी मोठी पाऊले उचलण्यात आली आहेत.

- उज्ज्वला योजेनच्या अंतर्गत आठ कोटी महिलांना गॅस सिलेंडर पुरवण्यात आले आहे.

-अटल पेन्शन योजने अंतर्गत 2 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मदत पुरवण्यात येत आहे.

- 6 कोटी नागरिकांना PM जीवन ज्योति योजना योजनेअंतरागत विमा लाभ पुरवला जात आहे.

- आयुष्यमान भारत योजनेतून 50 कोटी नागरिकांना 5 लाख रुपयांच्या आरोग्य संबंधित मदतीचा हात देण्यात आला आहे.(Atma Nirbhar Bharat Abhiyan: केंद्र सरकार मजुरांना 2 महिने देणार मोफत राशन; कार्डची आवश्यकता नाही)

पहा 6 साल बेमिसाल व्हिडीओ

नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी म्हणजेच 24 मे 2019 रोजी पंतप्रधान पदाची शर्यत पुन्हा एकदा जिंकून देशात दुसऱ्यांदा निवडून येण्याचा मान मिळवला होता. यावेळी निडवून आल्यावर त्यांनी देशाच्या आकांशा पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. तिहेरी तलाक, CAA, काश्मीर मधून 370 आणि 35 A हटवणे अशी कामे या कार्यकाळाच्या सुरुवातीला करण्यात आली आहेत.

मोदी सरकारच्या काळात अयोध्या राम मंदिर, भारताचे मंगळयान यश असेही काही प्रसंग आले, याकाळात मोदींनी देशाला प्रगती पथावर नेण्यात मेहनत घेतली असल्याचा दावा या व्हिडीओ मधून करण्यात आला आहे.