Rajiv Gandhi Assassination Case: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेली नलिनी श्रीहरण Nalini Sriharan हिने कारागृहातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. वेल्लोर कारागृहात (Vellore jail) नलिनी श्रीहरण पाठीमागील 29 वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. कारागृहातील एका कैद्याशी झालल्या भांडणातून नलिनी हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षाने प्रसंगावधान दाखवल्याने पुढील अनर्थ टळला.
नलिनी श्रीहरण हिचे वकील पुगलेंती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील दुसऱ्या एका कैद्याशी नलिनी हिचे भांडण झाले. त्यातून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गेली 29 वर्षे नलिनी ही वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. मात्र, तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, नलिनी हिची प्रकृती सध्या ठिक आहे. नलिनीचा पती मुरुगन याने नलिनी हिची रवानगी दुसऱ्या कारागृहात व्हावी अशी मागणी केली आहे.
नलिनी श्रीहरण हिच्या वकिलाने पुढे म्हटले आहे की, तिचा पती मुरुगन याने केलेल्या मागणीसाठी आम्ही न्यायालकडे दाद मागू. वेल्लोर येथील कारागृहात नलिनीच्या जीविताला धोका आहे. ज्या कैद्यासोबत नलिनी हिचे भांडण झाले त्या कौद्यालाही जन्मेठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळे नलिनी हिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, 2019 मध्ये नलिनी हिला एक महिन्याच्या कालावधीसाठी पॅरोल रजा मिळाली होती. तिच्या मुलीचे लग्न होते. या लग्नसाठी तिला रजा मंजूर करण्या आली होती. 21 मे 9191 मध्ये तामिळनाडू येथील श्रीपेंरबदूर येथे एका कार्यक्रमात आत्मघातकी हल्ला करुन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे लिब्रेशन ऑफ तिमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेचा हात होता. या हत्येचा कट श्रीलंकेत रचण्यात आला होता. या कटाचा मुख्य सूत्रधार एलटीटीई प्रमुख प्रभाकरण आणि त्याचे सार सहकारी बेबी सुब्रह्मण्यम, मुथुराजा, मुरुगन, शिवरासन सहभागी होते. हा कट 1990 मध्ये रचण्यात आला होता.
राजीव गांधी हत्या प्रकरणात दोषी असलेल्या नलिनी हिने धानू नावाच्या मुलीचा शोध घेतला होता. याच धानूने आत्मघातकी हल्ला केला होता. ज्यात पंतप्रधान राजीव गांधी शहीद झाले. हा हल्ला यशस्वी व्हावा यासाठी नलिनीच्या घरी धानूने अनेक वेळा सराव केला होता.