New Mom | Pixabay.com

मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या तसेच भारत सरकारच्या ‘वन नेशन, वन स्टॅण्डर्ड’ या उद्दिष्टाच्या दिशेने पुढील पाऊल टाकण्याच्या उद्देशाने, एनएबीएच व एफओजीएसआय यांच्यात २०२२ मध्ये झालेल्या धोरणात्मक करारानुसार आता नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्सने (एनएबीएच) फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजल सोसायटीज ऑफ इंडियाच्या (एफओजीआयसी) मान्यता माता आरोग्य दर्जा मानकांचा समावेश एनएबीएचच्या सर्व प्रमाणन कार्यक्रमांमध्ये केला आहे. बाळंतपणादरम्यान व बाळाच्या जन्मानंतर मातांची सातत्यपूर्ण, सुरक्षित व आदरपूर्वक काळजी घेण्याच्या प्रक्रियेत विशिष्ट दर्जा राखला जाईल याची खातरजमा हा उपक्रम करतो. बाळाच्या जन्मपूर्वी (अँटिनेटल), बाळंतपणादरम्यान (इंट्रापार्टम) व बाळंतपणानंतर (पोस्टपार्टम) अशा टप्प्यांमध्ये मातेच्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घालून दिलेल्या मानकांच्या आधारे पुराव्यावर आधारित क्लिनिकल नियमांचा अवलंब करण्यास हा उपक्रम उत्तेजन देतो.

मान्यता मानकांनुसार प्रशिक्षण घेतलेल्या २०० खासगी प्रसुतीगृहांचे मूल्यमापन एनएबीएचच्या मूल्यांकनकर्त्यांद्वारे करण्यात आले. एफओजीएसआयने या कामासाठीच मूल्यांकन करणाऱ्यांची नियुक्ती केली होती व त्यांना प्रशिक्षणही दिले होते. मूल्यमापन एफओजीएसआय किंवा एनएबीएच यापैकी कोणाच्याही मूल्यांकनकर्त्यांनी केले तरीही प्रमाणन सातत्याने यशस्वी ठरत गेल्याचे प्रायोगिक तत्त्वावरील परीक्षणात आढळले. एनएबीएचचा प्रवेश-स्तरावरील प्रमाणन कार्यक्रम करत असलेल्या आस्थापनांना यापुढे एनएबीएच आणि मान्यता यांची दुहेरी प्रमाणपत्रे प्राप्त होऊ शकतील. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्यसेवा मानक व विशेषीकृत माता सेवा नियम या दोन्हींची पूर्तता करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब होईल, एनएबीएच होप पोर्टल त्यांना अर्ज प्रक्रिया व मूल्यमापनासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म पुरवेल. याशिवाय संस्थेच्या नेटवर्कचा लाभ घेत एफओजीएसआय मूल्यांकनकर्त्यांचा शोध घेईल. त्यांना एनएबीएचद्वारे प्रशिक्षण दिले जाईल आणि प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग या क्षेत्रांचे विशेष ज्ञान असलेल्या एनएबीएच मूल्यांकनकर्त्यांचा एक समर्पित समूह तयार होईल.

टाळता येण्याजोगे मातामृत्यू हा भारतात अद्यापही लक्षणीय चिंतेचा विषय आहे. ही घोषणा म्हणजे या समस्येवर उपाय करण्याच्या दिशेने दिलेले एक स्वागतार्ह आश्वासन आहे. भारतात माता आरोग्यसेवेची पूर्तता अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, अधिक चांगली आरोग्य निष्पत्ती साध्य करण्यासाठी मानकीकृत सेवा नियम प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे.