लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (Mumbai Coastal Road) (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (South) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल. (हेही वाचा - Badlapur Metro News: अंबरनाथ-बदलापूर मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडणार, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती)
पाहा पोस्ट -
तयार व्हा..
विलोभनीय समुद्री तटाचा आणि भूयारी मार्गाचा अनुभव घेत प्रवास करायला..
मुंबई किनारी रस्ता लवकरच आपल्या सेवेत..#BMCUpdates#MumbaiCostalRoad pic.twitter.com/lCW18nL57N
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 10, 2024
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी 4.35 कि.मी. असून पुलांची एकूण लांबी 2.19 कि.मी. असणार आहे.
11 मार्चपासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला
मुंबईत बहुचर्चित कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरलाय. येत्या सोमवारी म्हणजेच ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कोस्टर रोडचा पहिला टप्पा मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झालं असून याची एक मार्गिका सोमवारपासून सुरु होणार आहे.