IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

गोवा- मुंबई दरम्यान इंडिगो विमानाला (Goa-Mumbai IndiGo Flight) सोमवारी (13  जानेवारी) संध्याकाळी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. दरम्यान सारी सुरक्षेची काळजी घेत विमानाने गोवा- मुंबई प्रवास करून मुंबई विमानतळावर  (Mumbai Airport) मध्ये लॅन्डिंग केले असून विमानातील सारे प्रवासी सुरक्षित आहेत. बॉम्ब ठेवल्याची धमकी गोवा-मुंबई Flight 6E 5101 ला मिळाली होती. विमानाच्या लॅन्डिंग नंतर एअरक्राफ्ट थेट आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले होते. सार्‍या standard operating procedures पाळून प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती आज मंगळवारी एअरलाईन च्या प्रवक्त्यांनी दिली आहे. एअरलाईन च्या जारी स्टेटमेंट मध्ये संबंधित प्रशासनाने क्लिअरन्स दिल्यानंतरच विमान पुन्हा माघारी टर्मिनल्स वर आणण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

विमानतळावरील अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, विमानात बॉम्ब असल्याची एक नोट मिळाल्यानंतर तातडीने इमरजंसी जारी करण्यात आली. मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री 10.30 वाजता full emergency सांगण्यात आली होती. सुरक्षेचे सारे नियम पाळत कारवाई करण्यात आल्यानंतर 11.30 च्या सुमारास emergency तासाभराने हटवण्यात आली आहे.

संपूर्ण घटनेत विमान कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. फ्लाइटमध्ये बसलेल्या प्रवाशांची संख्या उघड करण्यात आली नसली तरी, सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली.