Photo Credit- X

India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Live Telecast: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND W vs IRE W) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 12 जानेवारी (रविवार) रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम खेळवला जाईल. भारतीय महिला आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघातील तिसरा एकदिवसीय सामना भारतातील स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग जीओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. दरम्यान, भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याचे प्रसारण दूरदर्शन नेटवर्क डीडी फ्री डिशवर उपलब्ध असणार आहे.

भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 5 विकेटच्या मोबदल्यात 370 धावांचा मोठा डोंगर उभा केला. या डावात जेमिमा रॉड्रिग्जने 91 चेंडूत 102 धावांची शानदार शतकी खेळी केली. तिच्याशिवाय, हरलीन देओलनेही 89 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर कर्णधार स्मृती मानधनाने जलद सुरुवात करत 54 चेंडूत 73 धावा केल्या. प्रतिका रावलनेही 67 धावांचे योगदान देऊन भारताला मजबूत स्थितीत आणले.

आयर्लंडकडून ओर्ला प्रेंडरगास्ट आणि आर्लीन केली यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले परंतु भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळीचा सामना करण्यात त्यांना अपयश आले. प्रेंडरगास्टने 8 षटकांत 75 धावा देत 2 बळी घेतले, तर केलीने 10 षटकांत 82 धावा देत 2 बळी घेतले. पहिला एकदिवसीय सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यातही आपले वर्चस्व कायम ठेवले. आयर्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 371 धावांचे लक्ष्य आहे, जे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असेल.

सामन्याचे थेट प्रक्षेपण डीडी नॅशनल किंवा डीडी स्पोर्ट्स डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल?

भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला संघातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्याचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सने विकत घेतले आहेत. जे या सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील प्रदान करेल. तथापि, डीडी स्पोर्ट्स 1.0 वर भारताच्या या सामन्याचे थेट प्रक्षेपण फक्त डीडी फ्री डिश आणि इतर डीटीटी (डिजिटल टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.