मुंबई: अनधिकृतपणे बाटलीबंद पिण्याचे पाणी विकणाऱ्या 22 जणांना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अनधिकृतपणे बाटलीबंद पिण्याचे पाणी विकणाऱ्या 22 जणांना मुंबईतून (Mumbai) अटक करण्यात आली आहे. आरपीएफने (RPF) ही कारवाई केली असून सध्या रेल्वे स्थानकांवर अनधिकृतपणे बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची विक्री केली जात असल्याची बाब समोर आली आहे. तर आता आरपीएफकडून अशा प्रकारावर चाप बसवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

देशभरातील रेल्वे स्थानकांवर बाटलीबंद पाण्याची विक्री सर्रास होताना दिसून येते. खासकरुन लांब पल्ल्याच्या गाड्या स्थानकांवर थांबल्यास तेथे काही विक्रेत्यांकडे सुद्धा पाण्याच्या बॉटल्स दिसून येतात. मात्र या प्रकरणी काही विचित्र प्रकार सुद्धा उघडकीस आले आहेत. तर वापरलेल्या बॉटल्समध्ये पुन्हा नव्याने पाणी भरुन ते प्रवाशांना विकले जात असल्याची तक्रार आरपीएफला कळवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता अनधिकृतपणे बाटलीबंद पाणी विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मोहिमेला 'ऑपरेशन थर्स्ट' असे नाव देण्यात आले आहे.

(बेस्ट ने एका दिवसात 5 लाख प्रवाशांची वाढ करुन घडवला इतिहास, तिकिट दर कमी झाल्याने घडला हा चमत्कार)

या मोहिमेअंतर्गत बाटलीबंद पाणी विकण्याचा परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर अशा विक्रेत्यांकडून पाण्याच्या बॉटल्स सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. अनधिकृतपणे विकल्या जाण्याऱ्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. आता पर्यंत आरपीएफकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 48 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.