जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीचे (GVK Group of Companies) चेअरमन आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) चे व्यवस्थापकीय संचालक यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल (Money Laundering Case) केला आहे. 805 कोटींच्या अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित, जीव्हीके समूहाचे अध्यक्ष संजय रेड्डी (Sanjay Reddy) आणि एमआयएएलचे व्यवस्थापकीय संचालक जीव्ही संजय रेड्डी (GV Sanjay Reddy) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईसीआयआरमध्ये काही विमानतळ प्राधिकरण (एएआय) च्या अधिकाऱ्यांची आणि इतर नऊ खासगी कंपन्यांची नावे आहेत.
या तक्रारीत तपास यंत्रणेने आरोप केला आहे की, आरोपींनी 805 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार केला असून, परिणामी सरकारी तिजोरीचे 2012-18 या दरम्यान नुकसान झाले. यापूर्वी या सीबीआयने घोटाळ्याप्रकरणी तपास केला होता. एमआयएएलने म्हटले आहे की, त्याविरूद्धचा हा खटका धक्कादायक आहे.
एमआयएएलच्या प्रवक्त्याने इंडिया टुडेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘प्राथमिक चौकशी सुरू केली गेली असता एजन्सीने स्पष्टीकरण किंवा कागदपत्र मागितली असती, तर आम्ही सर्व मदत केली असती. एमआयएएल ही एक पारदर्शक आणि जबाबदार कॉर्पोरेट संस्था आहे, जे सत्य समोर आणण्याच्या चौकशीसाठी एजन्सीला सहयोग देण्यासाठी वचनबद्ध आहे.’ (Air India कडून अमेरिकेसाठी सुरु करण्यात येणार विमानसेवा, 6 जुलै पासून प्रवासी करु शकणार तिकिट बुकिंग)
सीबीआयने जी वेंकट कृष्णा रेड्डी, जी.व्ही. संजय रेड्डी आणि एएआय आणि इतर नऊ खासगी कंपन्यांविरूद्धही एफआयआर दाखल केला आहे. याआधीच्या तपासानंतर एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, साल 2017-2018 दरम्यान, या सर्व आरोपींनी एअरपोर्ट दुरुस्ती आणि डेव्हल्पमेंट कामांसाठी 310 कोटीचे बोगस कॉनट्रॅक्ट केले आणि हे पैसे भारताबाहेर परदेशात वेग वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुणतवले. सीबीआयकडून दाखल करण्यात FIR मध्ये GVK group ला त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि कर्मचार्यांना फायदा मिळवून दिल्याने AAI ला नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.