राष्ट्रीय एअरलाईन्स कंपनी Air India यांनी वंदे भारत मिशन अंतर्गत येत्या 11 ते 19 जुलै दरम्यान अमेरिकेसाठी (USA) विमान सेवा सुरु करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि अमेरिका दरम्यान एकूण 36 विमाने चालवण्यात येणार आहेत. या विमानसेवेमुळे कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येता येणार आहे. तसेच भारतील अमेरिकेतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात जाता येणार आहे.(कोलकातासाठी येत्या 6-19 जुलै दरम्यान दिल्ली, मुंबईसह 'या' 6 शहरांमधून विमान सेवेवर बंदी)
एअर इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसाठी चालवण्यात येणाऱ्या विमानसेवेसाठी तिकिट बुकिंग फक्त त्यांच्या संकेतस्थळावरुन किंवा कार्यालयामधून करता येणार आहे. विमान तिकिट 6 जुलै पासून पहाटे 2 वाजल्यापासून सुरु होणार आहेत. म्हणजेच न्युयॉर्क येथे सकाळी 10.30 वाजल्यापासून प्रवाशांना तिकिट बुकिंग करता येणार आहे. शिकागो येथे सकाळी 9.30 वाजल्यापासून बुकिंग सुरु होणार आहे. सॅन फ्रॅन्सिस्को येथे सकाळी 7.30 वाजता बुकिंग सुरु होणार आहे.(भारतामध्ये 15 जुलै पर्यंत प्रवासी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार: DGCA ची माहिती)
Air India will operate 36 flights between India & USA from 11th July to 19th July, 2020 under #VandeBharatMission: Air India pic.twitter.com/RZPPEIHDlP
— ANI (@ANI) July 5, 2020
एअर इंडियाकडून 3-15 जुलै दरम्यान, अमेरिकेसाठी 31 आणि कॅनडासाठी 9 विमाने चालवत आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुतांश भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. याच कारणास्तव भारत सरकारने वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशी आणले जात आहे.
तसेच DGCA यांनी नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी येत्या 15 जुलै पर्यंत असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ही बंदी मालवाहू विमाने आणि विशेष स्वरुपातील सर्विससाठी लागू नसणार आहे. परिपत्रकानुसार भारतातून येणारी-जाणारी आंतरराष्ट्रीय कमर्शियल फ्लाइट्स 15 जुलैच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत उडणार नाहीत.