कोलकातासाठी येत्या 6-19 जुलै दरम्यान दिल्ली, मुंबईसह 'या' 6 शहरांमधून विमान सेवेवर बंदी
Airlines | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

कोरोना व्हायरस सारख्या महासंकटाने देशात थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारताचे सुद्धा नाव जोडले गेले असून चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. देशात गेल्या 24 तासात सर्वााधिक 22 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पश्चिम बंगालच्या सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी निर्णय जाहीर करत असे म्हटले आहे की, कोलकाता येथून दिल्ली, मुंबई, पुणे, नागपुर, चैन्नई आणि अहमदाबादसाठी येत्या 6 ते 19 जुलै पर्यंत विमान सेवा बंद राहणार आहे. हा निर्णय वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे घेण्यात आला आहे. एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता विमानतळाचे निर्देशक यांनी पश्चिम बंगालच्या सरकारने विमानसेवेवर बंदी घातल्याचे म्हटले आहे.

देशातील अन्य राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल येथे सु्द्धा कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. 3 जुलै पर्यंत कोरोनासंदर्भात आलेल्या आकडेवाडीनुसार, कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये एका दिवासात 699 जणांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या पार गेला आहे. त्याचसोबत 717 जणांचा बळी गेला आहे.(Coronavirus in India: मागील 24 तासांत 22,771 रुग्णांच्या मोठ्या वाढीसह देशातील कोरोना बाधितांचा आकडा 648315 वर)

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंन्टेंटमेंट झोनमध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. संपुर्ण देशभरात सुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशभरातील विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती. आता आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घातली आहे.