Rain (Photo Credits: Facebook)

देशभरात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील विविध भागात पाणी साचले आहे. तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा जोर वाढला असून सखळ भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच दरम्यान आता गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटकासह उपविभागातील किनार पट्टीला पुराचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत सेंन्ट्रल वॉटर कमिशन ऑफिशल फ्लड फॉरकास्ट यांनी माहिती दिली आहे. तसेच आयएमडी यांनी फ्लॅश फ्लड (Flash Flood) मार्गदर्शन सुद्धा जाहीर केले आहेत.

आयएमडी यांनी गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह सौराष्ट्र येथे पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार असल्याचे म्हटले आहे. तर कच्छ येथे आज आणि उद्या अतिवृष्टी होणार आहे. त्याचसोबत ओडिशा, छत्तीसगढ, ईस्ट मध्य प्रदेश, गंगेटिक पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे ही अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Maharashtra Monsoon Update: येत्या 24 तासांत कोकण, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता- IMD)

दुसऱ्या  बाजूला  पावसाची संततधार सुरु असल्याने राजाराम तलावातील पाण्याची पातळी 39 फुट पर्यंत वाढली आहे.  कोल्हापूर मधील पंचगंगा नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कर्नाटक किनारपट्टी येथे आज, 8 आणि 9 ऑगस्टला अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचसोबत साऊथ कर्नाटकासह विविध ठिकाणी आणि तमिळनाडू सुद्धा आज, उद्या, 8-9 ऑगस्टला पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे ही आयएमडी यांनी सांगितले आहे.