Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मुंबईसह महाराष्ट्राच्या (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत (Mumbai) काल (4 ऑगस्ट) रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आजही कायम आहे. भांडूप (Bhandup), विक्रोळी (Vikhroli), मुलूंड (Mulund) परिसरात विजेच्या कडकडाट जोरदार पाऊस सुरु आहे. येत्या 24 तासांत कोकण (Konkan), मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत काल सकाळपासूनच पावसाने चांगला जोर धरला असून आजही हा जोर कायम आहे. लोकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये आणि स्वत: ची काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून हिंदमाता, किंग्ज सर्कल, अंधेरी सबवे या भागांचा समावेश आहे. तसेच काही ठिकाणी वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली आहे. Mumbai Rain Updates: मुंबई मध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरूवात (View Photos)

येत्या 24 तासात कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई आयएमडी वर्तविली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाडा भागातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही सांगण्यात येत आहे.

नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये असेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 12 तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस झाला. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सुमारे 150mm हून अधिक पावसाची नोंद झाली.