Mumbai Rains | PHoto Credits: Twitter/ ANI

मुंबई मध्ये सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने मुंबईचं जनजीवन विस्कळीत होण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळापासूनच पावसाला जोर असल्याने मुंबईच्या सायन, किंग्स सर्कल सारख्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. दरम्यान काल देखील रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याचं वेधशाळेकडून स्पष्ट झाले होते. मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याने शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच रेल्वे सेवा देखील विस्कळीत होती. मात्र आज सकाळपासून मुंबईमध्ये अधून मधून जोरदार सरी बरसत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

किंग्ज सर्कल परिसरातील दृश्य

हवामान खात्याच्य अंदाजानुसार, आज दिवसभर मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. डहाणू मध्ये आज सकाळी 364 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 24 तासात,पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.