मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सायन येथील मध्य रेल्वे मार्गावरील 112 वर्षे जुना पूल पाडण्याच्या हालचालींना पुन्हा वेग येण्याची शक्यता आहे. सायन पुर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. पूर्व-पश्चिम उपनगरात येजा करण्यासाठी वाहनचालक व प्रवाशांना मोठा वळसा पडणार आहे. सायन पूल ब्रिटिशकालीन असून, तो 1912 मध्ये बांधण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)ने आपल्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये जाहीर केले आहे. (हेही वाचा - Mumbai Local Stunt Viral Video: मुंबई लोकलमध्ये स्टंट करणे पडले महागात; तरुणाने एक पाय आणि हात गमावला, मध्य रेल्वेने केलं ‘हे’ आवाहन)
पाहा पोस्ट -
दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी ते दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत सायन पुर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज हा मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. pic.twitter.com/o1fxegO3ow
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) July 27, 2024
सायन पुलावरून आधीच अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आता पुलाच्या कामासाठी वाहतूक पूर्ण बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता माहीम भागात जाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर प्रवास वाढणार आहे. त्यामुळे रिक्षा भाडे वाढल्यामुळे प्रवाशांची, तर वाहतूककोंडीमुळे रिक्षाचालकांची गैरसोय होणार आहे.