सायन स्टेशन (Sion Station) वरील पूलाचं पाडकाम 1 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. या पूलाच्या कामासाठी ट्राफिक मध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढील 3 वर्ष कायम राहणार आहेत. त्यामुळे सायन मार्गे पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी अनेकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 31 जुलैच्या रात्रीपासून हा पूल वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. पूलाच्या ठिकाणी पर्यायी रस्त्यांच मार्किंग दाखवले जाणार आहेत. वाहतूक व्यवस्थेमधील हे बदल 31 जुलै 2026 पर्यंत लागू असतील.
सायनच्या पूलावर सध्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ हलकी वाहनं सध्या पूलावर ये-जा करत असतात.
वाहतूकीच्या मार्गात होणार बदल
सायन च्या पूर्व आणि पश्चिमेला जोडण्याबरोबरच पश्चिम उपनगरात धारावी मार्गे जाण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता होता. Dr BA Road ने जाण्याऐवजी आता सायन हॉस्पिटल जवळून Sulochana Shetty Road मार्गे जावं लागणार आहे. कुर्ला आणि धारावीकडे जाणाऱ्यांना केके कृष्णन मेनन रोड आणि सेंट रोहिदास मार्गाने जावे लागेल. पश्चिम द्रुतगती मार्ग आणि वांद्रे वरून येणार्यांना सायन-माहीम लिंक रोड आणि कलानगर जंक्शन मार्गे वळसा घालून यावं लागणार आहे.
गर्दी कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सायन-माहिम लिंक रोड आणि सायन हॉस्पिटल जंक्शनजवळील सुलोचना शेट्टी रोडसह परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर नो-पार्किंग नियम लागू केला आहे. सायनच्या पूलाचं काम हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थापन व्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण आव्हान आहे, जो शहराच्या महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम कनेक्टरपैकी एकाला प्रभावित करतो. पण अधिका-यांना आशा आहे की नवीन, आधुनिक पूल पूर्ण झाल्यानंतर अल्पकालीन गैरसोयीमुळे दीर्घकालीन फायदे होणार आहेत.