Monsoon Updates 2020: गोव्यातील उत्तर, साउथ भागात येत्या 3-4 जुलैला अतिमुसळधार पावसाची शक्यता, मच्छिमारांना समुद्रान न जाण्याचे आवाहन
Representational Image | (Photo Credits: PTI)

उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु अद्याप हवा तसा पाऊस विविध ठिकाणी दाखल झाला नाही आहे. याच दरम्यान आता हवामान खात्याने येत्या 3-4 जुलै रोजी गोव्यातील (Goa) उत्तर आणि साउथ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.आयएमडी यांनी पावसाच्या अंदाजाबाबात माहिती देत पुढे असे ही म्हटले आहे की, समुद्रात मोठ्या लाटा सुद्धा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांसह नागरिकांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मध्य भारतात जुलै महिन्यात उत्तम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकणार आहे.

तर कर्नाटक येथे सुद्धा अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. समुद्राच्या ठिकाणाच्या भागात येत्या 5 जुलै पर्यंत पावसाचा जोर वाढलेला दिसून येणार आहे. त्यामुळेच आयएमडी यांनी उत्तर कन्नडा, दक्षिण कन्नडा आणि उडपी येथे ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार ते अतमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.(Mumbai Monsoon 2020 Updates: येत्या 2 दिवसांत मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता; IMD चा अंदाज)

दरम्यान, ईशान्य भारतात विशेषतः आसाम मध्ये मुसळधार पाऊस बरसल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोबतच उत्तर प्रदेशात सुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता. यंदा मान्सून मध्ये सरासरीच्या 100 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज सुरुवातीलाच वर्तवण्यात आला होता.