Monsoon 2020 | Image used for representational purpose only | (Photo Credits: IANS)

मुंबईत मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असले तरी यंदा मुसळधार पाऊस अद्याप मुंबईकरांना अनुभवता आलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला मान्सून मुंबईत पुन्हा एकदा सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाणे, पालघर या भागांत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरुन 14 जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला. परंतु. केवळ 18 जून रोजी जोरदार पाऊस बरसला. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2-3 जून रोजी कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान काल रात्री मुंबईसह उपनगरांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला असल्याची माहिती देखील के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

K S Hosalikar Tweet:

या आठवड्यात मुंबईत 100mm पावसाची नोंद झाली आहे. 30 जून आणि 1 जुलै या दोन दिवसांत अत्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. कुलाबा वेधशाळेने 6mm तर सांताक्रुझ वेधशाळेने 9.4 mm पावसाची नोंद केली आहे. त्यामुळे अद्याप मुंबईत पावसाची कमतरता जाणवत आहे. दरम्यान यंदा समाधानकारक पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.