![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/Chandrayaan-11-1-380x214.jpg)
नोकरी करणा-यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आपल्या PF आणि अन्य मासिक भत्ता यामुळे आपल्या पगारात खूप कपात होते आणि अत्यंत कमी पगार हातात येतो. अशा वेळी महिन्याचे बजेट कसे बनवायचे हा गहन प्रश्न लोकांसमोर पडलेला असतो. यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेटही कोलमडते. मूळ पगार जास्त असूनही फक्त EPF साठी पगारातून केली जाणारी कपात कर्मचा-यांच्या जिव्हारी लागते. त्यामुळे यावर तोडगा म्हणून एक नवीन तरतूद आणण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे नोकरदारवर्गाला आपल्या PF कपातीचा रक्कम कमी करता येईल जेणे करुन त्यांच्या दरमहा पगारात वाढ होईल. सरकार या आठवड्यात सोशल सिक्युरिटी कोड 2019 संसदेत सादर करू शकतं. यात ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
सद्य स्थितीनुसार, कर्मचा-यांच्या पगारात 12% PF साठी कपात केली जाते. यामुळे आपला मूळ पगार कमी होतो. त्यामुळे 12% पेक्षाही कमी PF कापला जावा याचा पर्याय आता कर्मचा-यांना देण्याची तरतूद मोदी सरकारच्या या नवीन तरतुदीमध्ये करण्यात आली आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आधीच मंजुरी मिळाली आहे. आता संसदेतही हे विधेयक मंजूर झालं की EPFO या नियमाचं नोटिफिकेशन काढेल. घरबसल्या 'अशी' पहा तुमच्या PF खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाची रक्कम
हे विधेयक जर मंजूर झाले तर MSME, टेक्सटाइल आणि स्टार्टअप्स अशा क्षेत्रांसाठी हा नवा नियम लागू होऊ शकतो. हा नियम अमलात आणण्यासाठी मागच्या 5 वर्षांपासून चर्चा सुरू आहे. पण हे विधेयक सोशल सिक्युरिटी विधेयकासोबतच सादर होणार आहे. याबद्दलचा अंतिम निर्णय आता सरकारच घेईल.
अलीकडे कर्मचाऱ्यांना आता त्यांचा युएन (UAN) क्रमांक स्वत:च जनरेट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने युएन क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना युएन क्रमांकासाठी नोकरीवर नियुक्त केलेल्या व्यक्तीकडे अर्ज द्यावा लागणार नाही आहे. ईपीएफओ यांच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ही माहिती देण्यात आली आहे.