घरबसल्या 'अशी' पहा तुमच्या PF खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) ६ कोटीपेक्षा अधिक खातेदारांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केला आहे.
कर्मचाऱ्यांना आता आपला PF खात्यामध्ये जमा झालेल्या व्याजाची रक्कम पाहणं शक्य होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) ६ कोटीपेक्षा अधिक खातेदारांच्या खात्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा केला आहे. तसेच अनेक खात्यांमध्ये २०१८-१९ च्या वर्षासाठी ८.६५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. २०१७-१८ या वर्षांत ८.५५ टक्के दराने व्याज जमा झाले आहे. तुम्हीही तुमचा PF घरबसल्या पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल. एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुमचा यूएएन, बँक खाते, पॅन (PAN) आणि आधार (AADHAR) लिंक असणे आवश्यक आहे. (हेही वाचा - नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी! PF सोबत कापण्यात येणाऱ्या पेन्शन काढण्याच्या नियमात बदल होण्याची शक्यता)
पीएफवरील व्याज तपासण्याची प्रक्रिया -
- तुमचा यूएएन नंबर ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असेल तर 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (अखेरची तीन अक्षरे भाषेसंदर्भात आहेत. ) असा मेसेज पाठवा. तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून खात्यासंदर्भात माहिती मिळेल.
- तसेच जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल, तर EPFOHO UAN HIN असा मेसेज पाठवा. ही माहिती तुम्हाला इंग्रजी, मराठी, हिंदी, पंजाबी, कन्नड, तेलगू, तमिल, मल्याळम आणि बंगाली भाषेमध्ये मिळू शकते.
- तुम्ही तुमच्या खात्याबाबतची संपूर्ण माहिती ईपीएफओच्या वेबसाइटवर पासबुकच्या माध्यमातून मिळवू शकता. परंतु, त्यासाठी तुमच्याकडे पासबुक पाहण्यासाठी यूएएन क्रमांक असणे आवश्यक आहे.
- तुम्ही मिस्ड कॉलच्या साहाय्यानेदेखील माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन 11-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. मिस्ड कॉलनंतर तुम्हाला ईपीएफओकडून तुमच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळेल.
भविष्य निर्वाह निधी खात्यातील ऑनलाइन रक्कम काढण्यासाठी तुमचा आधार कार्ड क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. तसेच एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुमचा यूएएन, बँक खाते, पॅन आणि आधार लिंक असणेही आवश्यक आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2019 04:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

