प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संगठन यांनी पेन्शन संबंधित एका मोठ्या नियमात बदल करण्याच्या तयारीत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेन्शनसाठी वयाची अट 58 वर्षांवरुन 60 सालापर्यंत केली जाऊ शकते. सोप्या शब्दात विविध ठिकाणी नोकरीच्या येथे तुम्ही जर 10 वर्षे काम केल्यास तुम्हाला पेन्शनची सुविधा मिळू शकते. तर 58 वर्ष वय झाल्यास नोकरदाराला मासिक पेन्शन अंतर्गत पैसे देण्यात येतात. इकोनॉमिक्स टाइम्सनुसार, EPFO साठी आता वयाची अट 58 वरुन 60 वर्ष करण्याची शक्यता आहे.

ईटीच्या मते EPF अॅक्ट 1952 मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरातील पेन्शन फंडमध्ये वयाची मर्यादा 65 वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळेच आता त्या वयोमर्यादेमध्ये बदल करण्याचा निर्णय लवकर घेण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात EPFO सेंट्रल बोर्ड ट्र्स्टच्या एका बैठकीत या मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. या निर्णयामुळे 30 हजार करोड रुपयांची दिलासा पेन्शन फंड मिळणार आहे. त्याचसोबत नोकरदार वर्गातील कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंटचे वयाची 2 वर्ष वाढवण्याची शक्यता आहे.(सरकारकडून पेन्शनच्या नियमात बदल, 'या' व्यक्तींना होणार फायदा)

तसेच नोकरदार वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील काही रक्कम दोन खात्यात टाकली जाते. त्यामधील पहिला म्हणजे प्रोव्हिडंट फंड म्हणजेच EPF आणि दुसरा म्हणजे पेंन्शन फंड असतो. कर्मचाऱ्याच्या वेतनामधील 12 टक्के हिस्सा ईपीएफमध्ये जमा करण्यात येतो. तसेच कंपनीकडून 3.67 टक्के ईपीएफ आणि बाकी 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जमा होतो. ईपीएफसाठी सध्या वेतन मर्यादा कमीतकमी 15 हजार रुपये आहे.