सरकारकडून पेन्शनच्या नियमात बदल, 'या' व्यक्तींना होणार फायदा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

सरकारकडून पेन्शनच्या काही नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या काळात सात वर्षाच्या आतामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला वाढलेली पेन्शन देण्यात येणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याचसोबत बदललेल्या पेन्शन नियमांचा फायदा मृत जवानांच्या बायकोला त्याचा लाभ मिळू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारकडून जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपतींनी केंद्रीय सिविल सेवा (पेन्शन) नियम, 1972 च्या नियमात बदल केले आहेत. तसेच केंद्रीय नियम सिविल सेवा (पेन्शन) दुसरा संशोधन नियम, 2019 येत्या 1 ऑक्टोंबर पासून लागू होणार आहे. यामध्ये सात वर्षापेक्षा कमी कार्यकाळात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला वाढलेली पेन्शन दिली जाणार आहे. यापूर्वी जर अशी घटना घडल्यास त्याच्या परिवाराला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनाच्या 50 टक्क्यानुसार वाढलेली पेन्शनची रक्कम देण्यात येत होती.

सरकारचे असे म्हणणे आहे की, करिअरच्या सुरुवातीला शासकीय कर्मचाऱ्याला वेतन कमी दिले जाते. त्यामुळे करिअरिअरच्या सुरुवातीच्या काळात जर मृत्यू झाल्यास परिवाराला वाढलेली पेन्शन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारकडून पेन्शन नियमात बदल करण्यात आले आहेत.(PMSYM: प्रतीमहिना 55 रुपये गुंतवा, सेवानिवृत्तीनंतर 36 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवा)

त्याचसोबत अधिसूचनेत असे सांगितले आहे की, 1 ऑक्टोंबर 2019 पर्यंत 10 वर्ष नोकरी पूर्ण करण्यापूर्वी एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याने सातत्याने सात वर्ष नोकरी पूर्ण केली नसल्यास त्याच्या परिवाराला ऑक्टोंबर 2019 च्या उपनियम (3) अंतर्गत वाढलेली पेन्शन सुविधा मिळणार आहे. मात्र पेन्शन मिळण्यासाठी काही अटी आणि नियमांची पुर्तता करणे अत्यावश्यक आहे.