Stop Rape (Representative image)

मणिपूर (Manipur) मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता माणूसकीला काळीमा ठरणार्‍या घटना समोर येत आहेत. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत आणि सोशल मीडीयावरही त्याची चर्चा होत आहे.

मणिपूरची राजधानी इंफाळ पासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यातील ही घटना आहे. हा प्रकार 4 मे चा असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारातील दोषींवर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता समोर येत आहे. पोलिस याप्रकरणी आरोपींना अटक करून बेड्या ठोकतील असं सांगण्यात आलं आहे.अज्ञातांविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  “तिन्ही महिलांना त्यांचे कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले असुन त्यांना जमावासमोर नग्न करण्यात आले." असे FIR मध्ये सांगण्यात आले आहे.

इंडिजिनियस ट्रायबल लीडर फोरम कडून सोशल मीडीयात वायरल असलेल्या या व्हिडिओ वर संताप व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये जमावाने महिलांची विवस्त्र धिंड काढून शेतात अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित आदिवासी आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी या प्रकरणी कडक पावलं उचलली जातील अशी ग्वाही दिली आहे. Manipur Women Naked Parade:मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंडेचे व्हिडीओ शेअर न करण्याचे भारत सरकारचे Twitter सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला आदेश .

कुकी आदिवासींच्या संघटनांनी देखील चुरचांदपूर मध्ये मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये या अत्याचाराचा विषय मांडला जाईल. सोशल मीडीयात राहुल गांधी, आदित्य ठाकरे, प्रियंका गांधी ते अभिनेता अक्षय कुमार यांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट्स

आजपासून दिल्लीमध्ये सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मणिपूर मधील हिंसाचाराची चर्चा होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. यावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले.