मणिपूर मुद्द्यावर चर्चा सर्वपक्षीयांशी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे समजते. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीत म्हटले की, आम्ही या मुद्द्यावर सर्वांगीण चर्चेसाठी तयार आहोत. सरकारच्या तयारीवर विरोधकांची प्रतिक्रिया काय येते याबाबत महत्त्वाचे आहे. केंद्राचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही भूमिका घेतली आहे. पाठीमागील अनेक दिवसांपासून मणिपूर अक्षरश: धुमसत आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर चकार शब्द काढला नाही. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेवर विरोधकांच्या प्रतिक्रियेला महत्त्व आले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)