Manipur Violence

मणिपूरमध्ये आदिवासी आणि बहुसंख्य मीतेई समुदायामध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. हिंसाचारानंतर राज्यात लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तरीही संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मणिपूरचे राज्यपाल अनुसुया उके यांनी संबंधित यंत्रणांना शूट अॅट साईटची ऑर्डर दिली आहे. ईशान्येकडील राज्यातील वाढती परिस्थिती पाहता मणिपूरला जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. मणिपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ईशान्य सीमा रेल्वेने मणिपूरला जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  एनएफ रेल्वेचे सीपीआरओ सब्यसाची डे म्हणाले की, "स्थिती सुधारत नाही तोपर्यंत कोणती ट्रेन मणिपुरमध्ये प्रवेश करणार नाही. मणिपुर सरकारकडून ट्रेनच्या दळणवळणावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी बुधवारी ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन मणिपूर यांनी विष्णूनगर तसेच चुराचांदपूर जिल्ह्यात मोर्चा आयोजित केला होता. यात मोठ्या संख्येने युवक सामील झाले होते. त्यावेळी विष्णूपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या गटाशी मोर्चेकऱ्यांची चकमक उडाली त्यातून एका समुदायाची घरे जाळण्यात आली. राजधानी इंफाळसह राज्यभर या हिंसेचे लोण पसरले. अखेर लष्कराला पाचारण करण्यात आले.

खोऱ्यात मेईटेसचे वर्चस्व असून ते एसटीचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. बांगलादेश आणि म्यानमारमधून घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रॅलीनंतर विविध समुदायांमध्ये हाणामारी झाली. प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये घरे आणि दुकाने जाळण्यात आली, ज्यामुळे अधिकाऱ्यांना पाच दिवस मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित करण्यास भाग पाडले. इम्फाळ पश्चिम, बिष्णुपूर, जिरीबाम, तेनुगोपाल आणि चुराचंदपूर जिल्ह्यांसह अनेक तणावपूर्ण डोंगराळ भागात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.