Manipur Exit Poll Results 2022 Live Updates: मणिपूरमध्ये कॉंग्रेसला मिळू शकतील 23 ते 27 जागा; 𝗜𝗔𝗡𝗦-𝗖𝗩𝗼𝘁𝗲𝗿 ने वर्तवला अंदाज
बातम्या
टीम लेटेस्टली
|
Mar 07, 2022 08:51 PM IST
Manipur Exit Poll Results 2022 Live Updates: सध्या संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. उत्तर प्रदेशातील मतदानाच्या सातव्या फेरीसह सोमवारी मतदानाची प्रक्रिया संपत आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. निकालापूर्वी, अनेक वृत्तवाहिन्या आज संध्याकाळपासून एक्झिट पोल घेऊन येत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या राज्यात कसे निकाल येऊ शकतात याचा अंदाज मिळेल. मणिपूर राज्यासंबंधी विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्चला दोन टप्प्यात मतदान झाले. येथे विधानसभेच्या 60 जागा आहेत. मणिपूरमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. मणिपूरमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 28 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी भाजपला 21 जागा मिळाल्या. मात्र अपक्ष आणि काँग्रेसच्या विरुद्ध पार्टीच्या जोरावर भाजपने सरकार स्थापन केले. आता उत्सुकता आहे की यावेळी मणिपूरमध्ये नक्की कोण सत्ता स्थापन करणार.
निवडणूक आयोगाने 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान एक्झिट पोल शेअर करण्यावर बंदी घातली होती. तसेच या कालावधीत मीडिया संस्थांना (मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही) निवडणूक निकालांचा अंदाज किंवा प्रकाशन करण्यास मनाई केली होती. एक्झिट पोल हे आगामी निवडणुकीच्या निकालांचा अंदाज आहेत. ज्यावरून मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे किंवा आघाडीकडे आहे हे कळते. वृत्तवाहिन्या हे सर्व सर्वेक्षण संस्थांच्या सहकार्याने करतात. बर्याचदा अशी सर्वेक्षणे निवडणुकीच्या निकालांशी जुळतात, तर कधी कधी अगदी उलट घडते.