Uddhav Thackeray, Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) उद्या (8 जून) दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची भेट घेणार असल्याची माहिती काही मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आले आहेत. दरम्यान राज्यात आता अनलॉक सुरू झाले आहे अअणि देशासह भारतातील कोविड परिस्थिती नियंत्रणामध्ये येत आहे. दरम्यान या भेटीमागील एक कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न असू शकतो. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल बोलताना गरज पडल्यास केंद्र सरकार सोबत बोलू असे संकेत दिले होते. त्यानुसारच आता ही भेट असू शकते असा अंदाज आहे.

न्यूज 18 च्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून PMO कडे वेळ मागण्यात आली होती. उद्या सकाळी 11 च्या सुमारास ही मोदी-ठाकरे भेट होऊ शकते असा अंदाज आहे. दरम्यान वेळोवेळी देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होत होती आणि ती ऑनलाईन होती. पण आता मराठा आरक्षणाचाप्रश्न मार्गी लावण्यासाठी, जीएसटीचा परतावा, चक्रीवादळासाठी आर्थिक मदत या बाबींचादेखील या चर्चेमध्ये समावेश होऊ शकतो.

सर्वोच्च न्यायलयाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला अवैध ठरवले होते तर हा विषय राज्याच्या अख्त्यारीतील नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता केंद्राकडे पाठपुरवठा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावून त्यांनी नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी कडून तसे संकेत देण्यात आले होते त्यामुळे आता उद्याच्या मोदी- ठाकरे भेटीकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान उद्याच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.