Congress Leader Kripashankar Singh Resigns from Congress (Photo Credits: Twitter/ @realkripasingh)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक (Maharashtra Assembly Elections) अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली असताना अजूनही पक्षामध्ये आयाराम- गयारामांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील अनेक दिग्गज नेते मंडळींनी शिवसेना (Shivsena), भाजपाची (BJP) वाट धरली होती. काँग्रेसला सुद्धा आज  कृपाशंकर सिंह (Krupashankar Singh)  यांच्या रूपात आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. कृपाशंकर यांनी आज, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)  यांच्याकडे दिल्ली येथे आपला राजीनामा सोपवला. (उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षातून बाहेर, पक्षांतर्गत कलहाला कंटाळून राजीनामा)

कृपाशंकर सिंह हे मुंबई मधील उत्तर भारतीय रहिवाशांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काँग्रेस पक्षातून 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली होती यामध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी काँग्रेसपासून दूर राहायला सुरुवात केली होती. दरम्यान भाजपा पक्षातील अनेक दिग्गज नेतेमंडळींसोबत त्यांच्या भेटीचे फोटो वारंवार समोर येत होते. यातही विशेषतः गणेशोत्सवाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी खास भेट दिल्यावर  कृपाशंकर भाजपा पक्षात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

ANI ट्विट

दरम्यान आज उर्मिला मातोंडकर यांनी पक्षातील अंतर्गत वादाचे कारण देत काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. उर्मिला यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून युतीच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात मोठी लढत दिली होती मात्र पराभवानंतर अवघीय सहा महिन्यातच त्यांनी देखील काँग्रेस पक्षाला अलविदा केले आहे.