मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) कुनो नॅशनल (Kuno National Park) पार्कमध्ये ठेवलेल्या दक्षा (Daksha) या मादी चित्ताचा (Female Cheetah) मृत्यू झाला आहे. उद्यानात असलेल्या इतर चित्त्यांशी झालेल्या झुंजीमध्ये दक्षा या मादी चित्त्याने प्राण गमावले. दक्षा आणि इतर काही चित्ते, जे दक्षिण आफ्रिकेतील नामिबीया येथून काही दिवसांपूर्वीच भारतात आणले गेले आहेत. हे सर्व चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) निवासाला ठेवले आहेत. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दक्षा या मादी चित्त्याचा फिंडा नामाक पुरुष चित्त्याशी हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात वायू (Vayu) आणि अग्नी (Agni) या चित्त्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय असे की, नामिबियामधून चित्ते आणल्यापासून कुनोमध्ये मरणारा हा तिसरा चित्ता आहे.
नामिबीया (Namibia) येथून गेल्या वर्षीपासून कुनो राष्ट्रीय उद्यानात वीस चित्ते आणण्यात आले होते. त्यापैकी दोन चित्त्यांचा मार्च आणि एप्रिलमध्ये मृत्यू झाला. त्यापैकी एक साशा हिचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला. 23 जानेवारी रोजी तिला काहीसा थकवा आणि अशक्तपणा जाणवला. ज्यामुळे तिच्यावर उपचार करावे लागले. पण, उपचारांना तिने दाद दिली नाही. तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू एप्रील 2023 मध्ये झाला. हा चित्ताही उद्यानात आणल्यावर आजारी पडला होता. (हेही वाचा - 'बॉयफ्रेंड' Oban अभयारण्य सोडल्यानंतर Cheetah आशा Kuno National Park मधून पडली बाहेर, शोध सुरू)
ट्विट
MP| A female Cheetah Daksha, brought from South Africa has died in Kuno National Park. This is the 3rd death so far: MP Chief Conservator of Forest JS Chauhan pic.twitter.com/dQp5V0f1Ek
— ANI (@ANI) May 9, 2023
दरम्यान, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, तीन मादी आणि दोन नर असे एकूण पाच चित्ते जूनमध्ये मान्सून सुरू होण्यापूर्वी कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे अनुकूलतेच्या शिबिरांमधून मुक्त केले जातील. त्यांचा निवास अधिकृतरित्या जंगलात असेल. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की चित्यांना KNP मधून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल आणि जोपर्यंत ते महत्त्वपूर्ण धोक्यात असलेल्या भागात प्रवेश करत नाहीत तोपर्यंत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले जाणार नाही. आत्तापर्यंत, नामिबियातून आणलेल्या आठपैकी चार चित्ते कुंपण घातलेल्या अॅक्लिमेटायझेशन शिबिरांमधून केएनपीमध्ये मुक्त-श्रेणीच्या परिस्थितीत सोडण्यात आले आहेत.