Lok Sabha Elections 2019: तृतीयपंथी महिला 11 वेळा अर्ज रद्द केल्यानंतर यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Lok Sabha Elections 2019: आजपासून (11 एप्रिल) देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सुरुवात झाली आहे. तसेच मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. परंतु बंगळूरु येथील एका तृतीयपंथी महिलेने 11 वेळा मतदान कार्डासाठी अर्ज दाखल  करुनही सातत्याने तिचा अर्ज रद्द करण्यात आला.

बंगळूरु येथे राहणारी तृतीयपंथी महिला रियाना ही यंदाच्या निवडणुकीसाठी वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तर रियाना ही गेली तीन वर्षे मतदान कार्ड मिळण्यासाठी सातत्याने अर्ज करत होती. मात्र 11 वेळा तिचा अर्ज नाकारला असल्याचे रियाना हिने सांगितले. परंतु आता 11 वेळा अर्ज रद्द केल्यानंतर मला मतदान कार्ड देऊ केले आहे.(हेही वाचा-Lok Sabha Election 2019: घरबसल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव, मतदान केंद्र कसं पहाल?)

2019 लोकसभा निवडणुकीसाठी तृतीयपंथीयांसाठी यंदाचे मतदान महत्वपूर्ण ठरणार असून त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर रियाना हिने वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर सातत्याने मतदान कार्डसाठी वारंवार अर्ज केले. परंतु तृतीयपंथी असल्यामुळे अर्ज वारंवार नाकारण्यात येत असल्याचे रियाना हिने सांगितले. त्यामुळे बंगळूरु येथील एका आमदाराच्या मदतीने आता मला मतदान कार्ड देऊ करण्यात आले असून यंदा मतदानाचा प्रथमच हक्क बजावणार असल्याचे रियानाने म्हटले आहे. तसेच तृतीयपंथील लोकांना शिक्षण, निवारा आणि वैद्यकीय सेवा यांसारख्या प्राथमिक सेवा सुद्धा मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याचे ही रियाना हिने म्हटले आहे.