लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) 2019 च्या मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल दिवशी पार पडणार आहे. 900 मिलियन्स मतदार उद्या मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. पण मतदान करण्यासाठी नागरिकांचं नावं मतदार यादीमध्ये (Electoral List) असणं आवश्यक आहे. मतदार यादीत नाव नसल्यास तुम्हांला मतदान करता येणार नाही. मग मतदान केंद्रावर जाऊन निराश होण्याआधीच घरबसल्या पहा ऑनलाईन माध्यमातून मतदार यादीमध्ये (Voters List) तुमचं नाव. (नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)
ऑनलाईन माध्यमातून कसं पहाल मतदार यादीमध्ये नाव?
मतदार यादीमध्ये दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा आहे. यामध्ये एक तुम्ही सारे तपशील भरून नाव शोधू शकता किंवा Electoral Photo ID Card म्हणजेच EPIC Number च्या माध्यमातून नाव शोधण्याची सुविधा आहे.
NVSP Website वर नाव कसं शोधाल?
- निवडणूक आयोगाच्या nvsp.in आणि electoralsearch.in.या दोन अधिकृत वेबसाईटवर मतदारांची माहिती उपलब्ध आहे.
- वेवपेजच्या डाव्या बाजूला 'Search Your Name in Electoral Roll' हा पर्याय आहे.
- नवीन पेज समोर आल्यानंतर तुम्हांला नाव, जन्मतारीख, कॅप्चा विचारला जातो.
- तुम्हांला नेमका मतदार संघ ठाऊक नसेल तर वेबपेजच्या बाजूला मॅपवर लोकेशन निवडू शकता.
- कॅप्चा कोड एन्टर केल्यानंतर 'सर्च' क्लिक करा.
- तुमचं नाव आणि इतर तपशील वेबपेजच्या तळाशी येतील.
EPIC Number माध्यमातून कसं शोधाल नाव?
- वोटर आयडी कार्डवर EPIC number हा बोल्ड अक्षरात लिहलेला दिसेल.
- NVSP Electoral च्या सर्च पेजवर 'Search Your Name in Electoral Roll'या पर्यायावर क्लिक करा.
- वेबपेजच्या वरच्या बाजूला दिलेल्या दोन पर्यायांपैकी Search by EPIC No या पर्यायावर क्लिक करा.
- EPIC No एन्टर केल्यानंतर राज्य निवडा. त्यानंतर खाली एका चित्रामध्ये की दिलेली असेल.जर तुमचं नाव मतदार यादीमध्ये असेल तर ते तुम्हांला दिसेल. जर तुम्हांला काहीच दिसत नसेल तर त्याचा अर्थ तुमचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही. मतदारयादीतील नावाप्रमाणेच ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र देखील पाहण्याची सोय आहे.
11 एप्रिल ते 19 मे या कालावधीमध्ये देशात सात आणि महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यादरम्यान पहिला टप्पा 11 एप्रिल दिवशी महाराष्ट्रामध्ये 7 आणि देशात 84 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. या निवडणूकीचा निकाल 23 मे 2019 रोजी लागणार आहे.