Layoffs 2023: वर्षभरात 500 कंपन्यांतील 1.5 लाख कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी; वाचा सविस्तर
Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

पाठिमागील काही दिवसांपासून जगभरातील अनेक नामांकीत आणि आंतरारष्ट्रीय कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा सपाटाच लावला आहे. Amazon कंपनीने यात सर्वात मोठे पाऊल टाकले. ज्यामुळे आयटी आणि सेवा क्षेत्रात मोठी उलथापालथ केली. अॅमेझॉनने नुकतेच 9000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले. तत्पूर्वी या कंपनीने 18,000 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. नुकत्याच प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सन 2023 मध्ये आतापर्यंत सुमारे 500 कंपन्यांनी जवळपास 1.5 लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले आहे. नेमकी आकडेवारी सांगायची तर ती 48,165 इतकी आहे. layoff.fyi टेक क्षेत्रातील नोकऱ्यांमधील कपातीचा मागोवा घेणारी वेबसाइट आहे. या आकडेवारीनुसार धक्कादाय वास्तव पुढे आले आहे.

सन 2022 हे वर्ष टेक कंपन्या आणि स्टार्टअप्ससाठी अत्यंत निराशाजनक ठरले. ज्यात 1.6 लाख कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. या सर्वांना कामावरुन कमी करण्याची कारणे जवळपास सारखीच होती. साधारण 1,046 टेक कंपन्यांनी पाठिमागील वर्षात 1.61 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले.

एकट्या जानेवारी (2023) मध्ये 1 लाख कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांनी जागतिक पातळीवर नोकरी गमवावी लागली. ज्यात एॅमेझॉन माइक्रोसॉफ्ट, गूगल, सेल्सफोर्स यांसारख्या इतरही काही कंपन्या आहेत. जानेवारीमध्ये 1,02,943 च्या तुलनेत यूएस मधील कंपन्यांनी फेब्रुवारीमध्ये 77,770 नोकऱ्या कमी केल्या. तंत्रज्ञान कंपन्यांनी टाळेबंदीच्या शर्यतीत आघाडीवर राहून गेल्या महिन्यात 21,387 नोकऱ्या कमी केल्या, जे सर्व कपातीच्या 28 टक्के होते.

गेल्या आठवड्यात, मेटा संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी येत्या काही महिन्यांत नोकरीच्या कपातीच्या अनेक फेऱ्यांद्वारे अतिरिक्त 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली.