अयोद्धा रेल्वे जंक्शनचं नाव 'अयोद्धा धाम जंक्शन' होणार; आमदार Lallu Singh यांची माहिती
Ayodhya Railway Junction Renamed as Ayodhya Dham (Photo Credits: X/@LalluSinghBJP)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अयोद्धा रेल्वे जंक्शनचं नाव 'अयोद्धा धाम जंक्शन' (Ayodhya Dham junction) करण्यात आलं आहे. याची माहिती स्थानिक आमदार लालू सिंग यांनी दिली आहे. डागडुजी करून स्टेशनचं रूप पालटण्यात आलं आहे. आता नव्या स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर 22 जानेवारीला अयोद्धेमध्ये राम मंदिरात रामलल्ल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी सध्या अयोद्धा सजली आहे.

सिंह यांनी X वर शेअर केलेल्या माहितीनुसार, 'अयोद्धा जंक्शन आता अयोद्धा धाम जंक्शन' होणार आहे. लोकभावनेचा विचार करता हे नामांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्याखाली होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra चे सेक्रेटरी Champat Rai यांनी दाखवला Shri Ram Janmabhoomi temple चा नकाशा .

पहा पोस्ट

22 जानेवारीच्या सोहळ्यापूर्वी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोद्धा नगरी मध्ये नवं रेल्वे स्थानक आणि विमानतळ यांचं उद्घाटन करणार आहेत. तर 22 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते 5 वर्षीय भगवान श्रीराम यांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहे. निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगणार आहे.