Shahi Snan at Kumbh Mela (Photo credits: Facebook/DY365)

भारतातील कोविड-19 (Coronavirus) साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे दररोज धक्कादायक माहिती देणारी आकडेवारी समोर येत आहे. परंतु निर्बंध डावलून धार्मिक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत आहेत. हरिद्वार (Haridwar) येथील कुंभमेळा (Kumbh Mela 2021) हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. इथल्या वाढत्या गर्दीमुळे उत्तराखंड सरकारला कोविड नियंत्रणाच्या मूलभूत प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यात अडचणी येत आहेत. गर्दीमुळे थर्मल स्कॅनिंग व्यवस्थित होत नाही किंवा लोक मास्कचाही वापर करत नाहीत. सोमवारी (12 एप्रिल) दुसर्‍या शाही स्नानासाठी 30 लाखाहून अधिक भाविक याठिकाणी एकत्र आले होते.

सोमवारी राज्य वैद्यकीय विभागामार्फत ज्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे, त्यामधील 18,169 पैकी 102 भाविकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे कुंभमेळ्यात नियमांची पायमल्ली झाल्याचे लक्षात येत आहे. महत्वाचे अनेक लोकांनी या मेळ्यात आपली थर्मल स्क्रीनिंग झाली नसल्याचे सांगितले. मात्र शाही स्नानादरम्यान राज्य सरकारने केंद्राने दिलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे संपूर्णपणे पालन केल्याचा दावा सीएम तीरथसिंग रावत यांनी केला आहे.

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार महाकुंभच्या दुसर्‍या शाही स्नानाबाबत म्हणाले, 'आमचा संपूर्ण प्रयत्न आहे की, शक्य होईल तितके कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले जावे. सुरक्षेच्या बाबतीत हे उत्तराखंड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. जितके लोक या कुंभासाठी अपेक्षित होते, कोरोनामुळे त्यापैकी फक्त 50 टक्केच लोक आले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार बुधवारी होणाऱ्या दुसर्‍या शाही स्नानासाठी गंगा स्नान करण्यासाठी, सुमारे 28 लाख भाविक पोहोचले आहेत.

(हेही वाचा: Corona Vaccination Programme: तुमची मनपसंत कोरोना लस लवकरच उपलब्ध! भारत विदेशातूनही मागवणार COVID 19 Vaccine

कुंभात थर्मल स्क्रीनिंगशिवाय इतर व्यवस्थाही अत्यंत कमकुवत आहेत. जे लोक मास्क घालत नाहीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि आरटी-पीसीआर चाचणीचा अनिवार्य अहवालदेखील पाहिला जात नाही. मेळ्यात बरेच लोक आले आहेत ज्यांच्याकडे कोरोना नकारात्मक टेस्टचा अहवाल नाही. दरम्यान, शाही स्नानच्या दिवशी, 13 आखाड्यांनी गंगेत स्नान केले. यावेळी मेळा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची विस्तृत व्यवस्था केली होती. यामध्ये 7 संन्यासी आखाडे, 3 बैरागी आखाडे आणि 3 वैष्णव आखाडे होते.