रेल्वे स्थानक, विमानतळ आणि मॉल मध्ये लवकरच मिळणार मटक्यामधील चहा, नितिन गडकरी यांचा नवा प्लान
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशातील प्रमुख रेल्वे स्थानक, बस डेपो, विमानतळ आणि मॉलमध्ये लवकरच आता मटक्यामधील चहा नागरिकांना मिळणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा हा नवा प्लान असून त्यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. सध्या वाराणसी आणि रायबरेली स्थानकात मटक्यामधील चहा प्रवाशांना दिली जाते.

गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पियुष गोयल यांना 100 रेल्वे स्थानकात मटक्यामधील चहा देणे अनिवार्य करण्याचे सांगितले आहे. तसचे विमानतळ आणि बस डेपो येथे चहाच्या दुकानावर सुद्धा याच पद्धतीने चहा देण्यात यावा. मटक्यामधील चहा मॉल मध्ये येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा देण्यात यावी याचा सुद्धा विचार आहे. यामुळे स्थानिक कुंभार काम करणाऱ्यांना रोजगाराची संधी निर्माण होईल. त्याचसोबत कागद आणि प्लास्टिक पासून बनलेल्या ग्लास वापरण्यावर बंदी येईल. यामुळे पर्यावरणालासुद्धा कोणतीही हानी पोहचणार नाही.(एअर इंडिया ला लागली उतरती कळा, थकबाकीमुळे थांबवला इंधन पुरवठा)

तसेच मटक्याच्या भांड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक उपकरण सुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. खादी ग्रामउद्योग आयोगाचे संस्थापक विनय कुमार सक्सेना यांनी असे सांगितले की, गेल्या वर्षात कुंभारांना मडकी बनवण्यासाठी 10 हजार इलेक्ट्रिक उपकरणाची सोय दिली होती. त्यामुळे यंदा 25 हजार इलेक्ट्रिक उपकरण देण्यात येतील हे आता लक्ष असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार कुंभार सशक्तिकरण योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक उपकरण देऊ करते.