Bomb Threat in Air India Flight: दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात (Air India Flight) काल मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. विमानत बॉम्ब असल्याचे समजात प्रवाशी विमान व्यवस्थापनात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर विमानाची तपासनी केली असता ती अफवा असल्याचे कळले. सध्या विमान कंपन्यांना बॉम्ब असल्याच्या (Bomb Threat) अनेक धमक्या येत आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा:Bomb Threat to Air India Flight: कोचीन विमानतळावरुन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; आरोपी अटकेत)
विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस. राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यावर त्यांनी एअरलाइन आणि विशाखापट्टणम विमानतळाला सतर्क केले. विमानाला बंदरगाह शहरात उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तपासनी केली. मात्र, तपासात काहीचं संशयास्पद आढळले नाही. (हेही वाचा: Delhi-Varanasi IndiGo Flight Bomb Threat: टेक ऑफ आधी इंडिगो विमानात आढळली बॉम्ब ठेवल्याची चिठ्ठी; विमान थांबवून शोध मोहीम सुरू)
एअर इंडियाच्या विमानात त्यावेळी 107 प्रवासी होते
Air India’s Delhi-Vizag flight receives hoax bomb threat
Read more ⬇️
https://t.co/cc1cSyrWq2 pic.twitter.com/BneHxD1QQk
— IndiaPost Live (@IndiaPostLive) September 4, 2024
रेड्डी यांनी पीटीआयला सांगितले की, विमानाचे सुरक्षित लँडींग करण्यात आले. विमानाचा संपूर्ण तपास केल्यानंतर कीही हाती न लागल्याने ती एक अफवा असल्याचे लक्षात आले. ते म्हणाले की, दिल्लीहून वायझॅगला जाणाऱ्या विमानात त्यावेळी 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना उतरवल्यानंतर विमान तपासले गेले त्यात, काहीही संशयास्पद आढळले नाही. मात्र, प्रवाशांना वेळ गेला.