West Bengal Blast: हुगळी येथे मुले खेळत असलेल्या तलावाजवळ भीषण स्फोट; एक ठार, दोघे गंभीर जखमी (Watch Video)
Photo Credit - X

West Bengal Blast: पश्चिम बंगाल (West Bengal)मधील हुगळी जिल्ह्यातील पांडुआ येथे सोमवारी झालेल्या स्फोटात(Bomb Blast)एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू (One Killed) झाला तर दोन जण गंभीर जखमी(Critically Injured)झाले आहेत. दोन्ही जखमी मुलांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या दोन अल्पवयीन मुलांपैकी एकाचा हात निकामी झाला आहे. तीन अल्पवयीन मुले खेळत असलेल्या तलावाजवळ हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. या तिघांनाही तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले. राज बिस्वास (11) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. रुपम बल्लव आणि सौरव चौधरी अशी दोन जखमी अल्पवयीन मुलांची नावे आहेत. (हेही वाचा: )

हुगळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सोमवारी दुपारी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी हे हुगळी लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आणि अभिनेत्री रचना बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ पांडुआ येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करणार होते. मात्र, या घटनेमुळे परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.