Bomb Threat to Air India Flight: एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानात मंगळवारी बॉम्ब असल्याची धमकी(Bomb threat) मिळाली. ज्यामुळे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर(Cochin Internationl Airport) काही काळ गोंधळ उडाला. कोचीन (COK) ते लंडन गॅटविक (LGW) कडे जाणारे एअर इंडियाचे विमान AI-149 साठी मंगळवारी पहाटे मुंबईतील एअर इंडिया कॉल सेंटरला धमकी मिळाली. त्यावेळी विमानात 215 प्रवाशी होते. (हही वाचा:IndiGo Plane Bomb Threat Case: इंंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची फसवी धमकी दिल्याने 27 वर्षीय आरोपीला अटक )
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोचीनमधील एअर इंडिया आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL)ला 01:22 वाजता अलर्ट तातडीने कळवण्यात आला. त्यानंतर तात्काळ एअरपोर्ट प्रशासनाकडून बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी (BTAC) बोलावण्यात आली. धमकीचे मूल्यांकन केले गेले. एअरलाइन सुरक्षा कर्मचारी आणि इनलाइन बॅगेज स्क्रीनिंग सिस्टीमद्वारे कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली.
दरम्यान, तपासात कॉल हा विमानातील प्रवाशानेच केल्याचे दिसून आले. कोंडोट्टी मलप्पुरमचा रहिवासी असलेल्या सुहैब (२९) याने धमीचा केला होता. जो AI-149 विमानाने लंडनला जाणार होता. त्यानंतर सुहैब याला त्याची पत्नी आणि मुलीसह, चेक-इन दरम्यान कोचीन विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय निर्गमन टर्मिनलवर एएसजीने अडवले आणि त्याची चौकशी करण्यात आली. सध्या कारवाईसाठी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले गेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोचीन विमानतळ BTAC च्या शिफारशींनंतर, विमान एका वेगळ्या पार्किंग पॉईंटवर हलवण्यात आले. ज्यात त्याची सखोल तपासनी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली.
विमानाची कसून तपासणी करण्यात आली आणि नंतर उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली. AI-149 साठी चेक-इन प्रक्रिया सकाळी 10:30 पर्यंत पूर्ण झाली. 215 प्रवाशांसाठी बोर्डिंग प्रक्रिया लवकरच सुरू होणार होती आणि विमान सकाळी 11:50 वाजता निघणे अपेक्षित होते. (ANI)