BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात मुंबई काँग्रेस अध्यक्ष राहिलेल्या एका नेत्याला भारतीय जनता पक्षाने (BJP) चक्क उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील जौनपूर लोकसभा मतदारसंघातून (Jaunpur Lok Sabha Constituency) उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे हा नेता एके काळी राज्य मंत्रीमंडळात मंत्रीही राहिला आहे. कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) असे या नेत्याचे नाव आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी 195 उमेदवारांची पहिली यादी काल (2 मार्च) रोजी जाहीर केली. या यादीत कृपाशंकरांचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणज लोकसभेसाठी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश आहे. ते वाराणसी येथूनच निवडणूक लढवणार आहेत.

'काँग्रेसकडे केवळ डीलरशिप'

जौनपूर येथून उमेदवारी मिळाल्याबद्दल वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना कृपाशंकर सिंह म्हणाले, भाजप मला उमेदवारी देईल हा विश्वास होता. या ठिकाणी मी प्रचंड मताधिक्याने विजयी होईल हा मला विश्वास आहे. मी आवर्जून सांगेन की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अब की बार 400 पार या घोषणेमध्ये जौनपूरचा समावेश नक्की होईन. कृपाशंकरांनी या वेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले भाजपकडे नेतृत्व आहे काँग्रेसकडे केवळ डीलरशिप आहे. मी काँग्रेस पक्षात असताना नेहमीच पक्षाची विचारधारा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेस विचारधारेपासून बाजूला गेली. ती बाजूला जात असल्याचे सांगणारा आणि त्याच कारणावरुन पक्षाला सोडचिठ्ठी देणारा मी पहिला व्यक्ती होतो, असे ते म्हणाले. कृपाशंकर सिंह हे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना त्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. शिवाय ते माजी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहे. सिंह यांनी 2019 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि 2021 मध्ये औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा, उत्तर प्रदेश मध्ये शाळेत 'मराठी' भाषा शिकवण्यासाठी महाराष्ट्र भाजपा नेते Kripashankar Singh यांचे CM Yogi Adityanath यांना पत्र)

उमेदवार यादीत 34 केंद्र आणि राज्यांचे मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री

दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 195 उमेदवारांचा समावेश आहे. जे वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत 195 उमेदवारांपैकी 34 केंद्र आणि राज्यांचे मंत्री आहेत, तर दोन माजी मुख्यमंत्री आहेत. पहिली यादी जाहीर करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले, "पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणूक वाराणसीतून, केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरण रिजिजू अरुणाचल पश्चिममधून, भाजपचे खासदार बिष्णू पदा रे अंदमान-निकोबारमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजप खासदार तापीर गाओ अरुणाचल पूर्वमधून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल दिब्रुगडमधून निवडणूक लढवणार आहेत. गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून तर मनसुख मांडविया पोरबंदरमधून निवडणूक लढवणार आहेत. या यादीत 47 तरुण उमेदवार, 28 महिला उमेदवार, 27 अनुसूचित जाती (SC) उमेदवार, 18 अनुसूचित जमाती (ST) उमेदवार आणि 57 OBC/मागासवर्गीय उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने सर्व समुदायांना केंद्रस्थानी ठेवून ही यादी जाहीर केली आहे,” असे भाजप नेते विनोद तावडे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.