Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
4 hours ago

Kokan Weather forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

कोकणात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकणात आज पासून पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या Dhanshree Ghosh | Aug 01, 2024 04:28 PM IST
A+
A-

kokan Weather Prediction, August02:  कोकणात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकणात आज पासून पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढचे काही दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर- उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत येत्या 3-8 ऑगस्ट दरम्यान समुद्रा मध्ये मोठी भरती येण्याची शक्यता असल्याने नागरिक, मच्छिमार, पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्र खवळलेला असताना पावसाचा आनंद घेण्यासाठी समुद्राजवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस कोकण आणि घाट माथावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणात उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणातील उद्याचे हवामान अंदाज, मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात उद्याचे हवामान कसे? 

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


Show Full Article Share Now