Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणातील उद्याचे हवामान अंदाज, मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात आज (7 July)रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार आज कोकणात घाट विभागात मुसलक्षर ते अती मुसळधार पावसाची शक्यात आहे.

Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणातील उद्याचे हवामान अंदाज, मुसळधार पावसाची शक्यता
photo credit : pixabay

Konkan Weather Prediction, July 8 : कोकणात आज (7 July)रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार आज कोकणात घाट विभागात मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यात आहे. 4 जुलै ते 8 जुलै या कालावधीत गुजरात, कोकण आणि महाराष्ट्रातील घाटातील वेगळ्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे यासह विशिष्ट प्रदेशांमध्ये या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळेल. येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. आता कोकणात उद्याचे हवामान कसे असतील हायसाठी हवामान खात्याने कोकणात उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा:  Weather Forecast For Tomorrow: ठाणे, नवी मुंबई पनवेलमध्ये गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद; जाणून घ्या उद्याचा राज्यातील हवामान अंदाज!

कोकणात उद्याचे हवामान कसे? 

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2024 05:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).